जळगाव जिल्ह्यात 11 विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या याद्या प्रसिद्ध
2 ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत
जळगाव : जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघाच्या मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करून तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्राच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याद्यांबाबत हरकती व सूचना 2 ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येईल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कळवले आहे.
जळगांव जिल्हयातील चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगांव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगांव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर अशा एकूण 11 विधानसभा मतदारसंघाच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.
मतदान केंद्राच्या प्रारूप याद्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा, जिल्हयातील सर्व सबंधित विधानसभा मतदार संघाच्या मुख्यालयी तसेच संबंधित विधानसभा मतदार संघाच्या तालुक्याच्या ठिकाणी मतदारांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आलेल्या आहेत, असेही प्रसाद यांनी कळविले आहे.


