फायनान्स कंपनीद्वारे कर्ज मंजुरीच्या नावाखाली धरणगावच्या व्यापार्‍याला नऊ लाखांचा गंडा


Dharangaon businessman extorted nine lakhs in the name of loan sanction by finance company जळगाव : धरणगाव शहरातील एका व्यावसायीकाची कर्ज मंजुरीच्या नावाखाली 9 लाख 15 हजार 98 रूपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी नामांकित फायनान्स कंपनीतून लोन मंजूर करून देतो, असे सांगून व्यापार्‍याचा विश्वास निर्माण करीत त्यांची फसवणूक केली.

असे आहे फसवणूक प्रकरण
जीवनराम आनंदाराम कुमावत (42, एमआयडीसी परीसर, धरणगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. व्यापार व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. 27 मार्च रोजीपासून त्यांना त्यांच्या मोबाईलवर मीनाक्षी अग्रवाल, आलिया, रूही शर्मा, सुधीर सक्सेना असे वेगवेगळे नाव सांगणार्‍या तरुणींनी संपर्क साधला. नामांकित फायनान्स कंपनीतून कर्ज मिळवून देतो असे खोटे सांगून याच कंपनीसह इतर कंपनीच्या पॉलीसी काढण्यास भाग पाडून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.




त्यानंतर 27 मार्च 2023 ते 26 सप्टेंबर 2023 या कालावधीत त्यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने एकूण नऊ लाख 15 हजार 98 रुपये ऑनलाईन उकळले मात्र कोणत्याही प्रकारचे कर्ज मंजूर न करता फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगळवार, 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता जीवनराम कुमावत यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धावघतक्रार दिली. त्यानुसार वेगवेगळे बनावट नावे सांगणार्‍या अज्ञात व्यक्तींविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !