घटस्फोट घेण्यासाठीच्या दबावाला कंटाळून हातेडच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
Tired of the pressure to get a divorce, the young man of Hated took the extreme step जळगाव : पत्नीकडील मंडळींकडून सातत्याने घटस्फोट देण्यासाठी लावण्यात येणारा तगादा व मिळालेल्या धमकीला कंटाळून हातेडच्या तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी विवाहितेच्या कुटूंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश उत्तमराव मोकाशे (37, हातेडे बुद्रुक, ता.चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
सतत्याच्या तगाद्याला कंटाळून उचलले तरुणाने पाऊल
योगेश मोकाशे या तरुणाचा विवाह भाग्यश्री उर्फ श्वेतासोबत झाला होता मात्र संशयित मधुकर राजाराम पाटील, अनुपमा मधुकर पाटील, पवन मधुकर पाटील (करमाड, ता.पारोळा), अश्विनी संदीप ठाकरे, संदीप ठाकरे (रा.पुणे), पूनम गणेश पाटील, गणेश पाटील (पारोळा), राजेंद्र जगन्नाथ भदाणे, सुशील जगन्नाथ (भदाणे, रा.बोरकुंड, ता.धुळे) योगेशला धमकी देत पत्नी भाग्यश्रीला घटस्फोट देण्याची मागणी केली. त्यानंतर विवाहितेच्या पालन पोषणासाठी पैसे देण्याची मागणी केली व पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी पत्नी भाग्यश्री योगेश मोकाशे हिला पोलिसत मयत तरुणासह दीर, सासू सासरे यांच्या विरोधात महिला छळ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडण्यात आले तसेच मयत तरुणाच्या घरातील संसारोपयोगी वस्तू गाडीत भरून नेण्यात आल्यानंतर योगेश यामुळे प्रचंड खचला व तणावात गेला. पत्नीच्या नातेवाईकांकडून मिळालेली धमकी, पत्नीने पोलिसात दिलेली तक्रार आणि घरातून सामान घेवून गेल्याचा त्रास सहन न झाल्याने योगेशने 21 सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.



या संशयितांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, मयताचा भाऊ महेश उत्तमराव मोकाशे याने चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यावरून संशयित आरोपी मधुकर राजाराम पाटील, अनुपमा मधुकर पाटील, पवन मधुकर पाटील (करमाड, ता.पारोळा), अश्विनी संदीप ठाकरे, संदीप ठाकरे (पुणे), पूनम गणेश पाटील, गणेश पाटील (पारोळा), राजेंद्र जगन्नाथ भदाणे, सुशील जगन्नाथ भदाणे (बोरकुंड, ता.धुळे) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.

