भुसावळ-बडनेरा मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत ; गाड्यांचा वाढणार वेग ; वेळेचा खोळंबा टळणार !
Automatic signal system operational on Bhusawal-Badnera route; The speed of cars will increase; Time will be avoided! भुसावळ : भुसावळ-बडनेरा मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. 18.27 किलोमीटर अंतराच्या वरणगाव-आचेगाव-बोदवड विभागात स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यान्वीत झाली असून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर किंवा 400 मीटर अंतरावर सिग्नल लावण्यात आले आहेत. सिग्नल प्रणालीमुळे अधिकाधिक गाड्या चालवण्यासाठी मदत होणार आहे.
गाड्यांच्या वेगमर्यादेत वाढ व वेळही वाचणर
पूर्वी अॅबसोल्युट सिग्नलिंग सिस्टीम मध्ये वरणगाव-आचेगाव-बोदवड विभागात फक्त स्थानकांवर सिग्नल होते. वरणगाव ते आचेगाव अंतर 6.35 किमी आणि आचेगाव ते बोदवड 11.92 किमी असून 6.35 किमी ते 11.92 किमी विभागात कोणतेही सिग्नल नव्हते मात्र आता विभागांमध्ये प्रत्येक एक किमी अंतरावर सिग्नल बसवण्यात आले आहेत. अशा प्रकारे प्रत्येक एक किमी अंतरावर सेक्शनमध्ये एक ट्रेन धावू शकणार असून गाड्यांचा वेग वाढण्यासह गाड्यांचा खोळंबा आता कमी होणार आहे.
एक किलोमीटर अंतरावर सिग्नल
वरणगाव-आचेगाव-बोदवडदरम्यान नवीन स्वयंचलित प्रणालीनुसार 25 सिग्नल बसवण्यात आले असून सहा नवीन सेमीऑटोमॅटिक सिग्नल बसवण्यात आले आहे तर प्रत्येकी एका किलोमीटर अंतरावर सिग्नल आहे. वरणगाव आणि बोदवड स्थानकांवरील विद्यमान पॅनेल इंटरलॉकिंगमधील इंटरलॉकिंगमध्ये बदल करण्यात आला आहे.
