बोदवड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान ; खासदार रक्षा खडसेंनी केली पाहणी


Damage due to heavy rain in Bodwad taluka ; MP Raksha Khadse inspected बोदवड : बोदवड परीसरात शुक्रवार, 22 रोजी अतिवृष्टीमुळे बर्‍याच गावांना नुकसानीचा फटका बसला. शेती-पिकांसह राहत्या घरांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी भाजपा पदाधिकारी व महसूल अधिकार्‍यांसह लोणवडी व धोंडखेडा येथे पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतातील पिकांसह घरांची अवस्था खासदारांच्या निदर्शनास आणून दिली. पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी खासदारांनी धीर देत शासनातर्फे लवकरच मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष विक्रमसिंग पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, परमेश्वर टिकारे, बोदवड शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, ईश्वर पाटील, सागर दांडगे, प्रीतम पाटील, राजू पाटील, विशाल गव्हाळे, सुपडा पाटील, सुनील निंबाळकर, संजू चौधरी, संदीप खवणे, जनार्दन चौधरी, मोहन देठे, मुकेश चौधरी, जनार्दन बावस्कर, प्रवीण भुसारी, तलाठी मनीष रत्नानी ई. व ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !