दुचाकी व रीक्षा चोरटे चाळीसगाव शहर पोलिसांच्या जाळ्यात


Two-wheeler and rickshaw thieves in Chalisgaon city police net चाळीसगाव : दुचाकी व रीक्षा चोरी करणार्‍या भामट्यांनी चाळीसगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश जयराम चव्हाण (लोणजे, ता.चाळीसगाव) व शेख फारुख उर्फ लावारीश शेख गफ्फार (52, अब्दुल खालीक नगर, सर्वे नं. 42, प्लॉट नं.33 नया ईस्लामपुरा, मालेगाव) अशी अनुक्रमे दुचाकी व रीक्षा चोरी करणार्‍यांची नावे आहेत.

दुचाकी प्रकरणी दाखल होता गुन्हा
तन्वीर शेख (चाळीसगाव) यांची गणेश कॉम्पलेक्स परीसरातून 49 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरताना 23 रोजी दोन संशयित आढळले होते तर नागरीकांची गर्दी होताच एक संशयीत पसार झाला तर चाळीसगाव पोलिसांना माहिती कळताच नाईक दीपक पाटील, महेंद्र पाटील, अजय पाटील, अमोल भोसले, शरद पाटील यांनी धाव घेतल्यानंतर एकनाथ चव्हाण (लोंजे, ता.चाळीसगाव) यास ताब्यात घेण्यात आले व त्याने या गुन्ह्यात साथीदार गणेश जयराम चव्हाण असल्याची माहिती देताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

लिप्टच्या बहाण्याने लांबवयचा रीक्षा : अखेर आवळल्या मुसक्या
2021 मध्ये पीरमुसा कादरी बाबा दर्ग्याजवळ मोहम्मद आसीफ इसा शहा यांची दोन लाख 80 हजार रुपये किंमतीची रीक्षा चोरीला गेली होती. हा रीक्षा आरोपी नामे शेख फारुख उर्फ लावारीश शेख गफ्फार (52, अब्दुल खालीक नगर, मालेगाव) याने केल्याची माहिती नाईक दीपक पाटील यांना मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

आरोपीविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने मोटार सायकलस्वार, रीक्षा चालक, चारचाकी वाहनात बसल्यानंतर वाहन चालकाचा विश्वास संपादन करीत त्यांना कचोरी, पेढे आदी पदार्थ खावू घालून गुंगी येताच वाहन लांबवत होता. आरोपीविरुध्द खुलताबाद, मालेगाव व इतर ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !