अमळनेरात व्यापार्‍यावर गोळीबार : लुटीचा डाव फसला


पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू

अमळनेर : शहरातील व्यापार्‍यावर गोळीबार करीत रोकड लांबवण्याचा प्रयत्न सतर्क व्यापार्‍यामुळे फसला. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. 3 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकरशेठ बितराई यांचे बंधू बसंतालाल बितराई हे मुलगा अजय याच्यासोबत दुकान बंद करून घराजवळ आले असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी उभयंतांच्या हातातील रोकड असलेली थैली हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र व्यापार्‍याने प्रतिकार करताच आरोपीने एक गोळी झाडली मात्र सुदैवाने ती भिंतीला लागली तर या घटनेनंतर संशयीत पसार झाले.

पोलिसांकडून संशयीतांचा कसून शोध
सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, शरद पाटील, रवी पाटील, हितेश चिंचोरे यांना घटना कळताच त्यांनी धाव घेतली. दरम्यान, घटना घडलेल्या न्यू प्लॉट भागातील नर्मदा वाडीजवळील परीसरातून आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !