आमोदा-बामणोद रस्त्यावर दुचाकी अपघात ; बामणोदचा प्रौढ ठार


Two-wheeler accident on Amoda-Bamanod road ; An adult of Bamanod is killed यावल : यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ आमोदा ते बामणोद रस्त्यावर दोन दुचाकींची धडक झाल्याने या अपघातात बामणोदच्या प्रौढाचा मृत्यू झाला. ;ज्ञप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चालकाविरोधात गुन्हा
आमोदा गावाजवळील बामणोद- आमोदा रस्त्यावर दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.जी. 8477) वरून युवराज प्रभाकर सरोदे (बामणोद) हे जात असताना समोरून दुचाकी (क्रमांक एम. एच.19 बी.एम.7314) निलेश हरी इंगळे (बामणोद) हे येत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात युवराज सरोदे यांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रभाकर भोजू सरोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात निलेश हरी इंगळे यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !