पुणे-अमरावती व एलटीटी-बल्लारशाह गाडीला मुदतवाढ


भुसावळ : आगामी सण-उत्सवाचे दिवस पाहता पुणे-अमरावती व एलटीटी-बल्लारशाह अप-डाऊन गाडीच्या 42 फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या गाड्यांची कालावधीत वाढ
ट्रेन क्रमांक 01439 पुणे-अमरावती द्वि-साप्ताहिक विशेष (14 ट्रिप) ही गाडी आता 29 ऐवजी 1 ऑक्टोंबर ते 17 नोव्हेंबरदरम्यान चालवण्यात येईल तसेच
गाडी क्रमांक 01440 अमरावती-पुणे द्वि-साप्ताहिक विशेष (14 ट्रिप) ही गाडी 30 सप्टेंबरऐवजी आता 2 ऑक्टोबर व 18 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 01127 लोकमान्य टिळक टर्मिनस-बल्लारशाह साप्ताहिक विशेष (7 ट्रिप) ही गाडी आता 3 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरदरम्यान वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 01128 बल्हारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (7 ट्रिप) ही गाडी आता 4 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान मदतवाढ देण्यात आली आहे. वरील गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 01439/01440 आणि 01127/01128 विशेष ट्रेनच्या विस्तारित प्रवासासाठी विशेष शुल्कावर बुकिंग 30 सप्टेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेत स्थळावर करता येणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !