मतदान केंद्रस्तरीय अधिकार्याचा कर्तव्यावरच हृदयविकाराने मृत्यू : धरणगाव तालुक्यातील घटना !
Polling station level officer died of heart attack on duty : incident in Dharangaon taluka ! धरणगाव : मतदान केंद्रस्तरीय अधिकार्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. रवींद्र रतीलाल बोरसे (51, रा.धुपे खुर्द, ता.चोपडा) असे मयत अधिकार्याचे नाव असूनते धरणगाव तालुक्यातील खर्दे येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत शिक्षकही होते.
कर्तव्यावरच आला हृदयविकाराचा झटका
रवींद्र रतीलाल बोरसे प्राथमिक शिक्षक हे जिल्हा रीषद प्राथमिक शाळा, खर्दे बु. ता. धरणगाव येथे सेवेत होते. त्यांच्या नियुक्तीच्या शाळेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पदाचे मतदान केंद्र क्रमांक 104 सुसूत्रीकरण विषयक कामकाज करीत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

दुर्दैवी वृत्ताने हळहळ
तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल केले असता, त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी सकाळपासून तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे विविध गावांना भेटी देऊन आढावा घेत होते मात्र खर्दे येथे जाण्याआधीच दुर्दैवी बातमी समोर आली. बोरसे यांच्या निधनाने जिल्हा निवडणूक अधिकारी व निवडणूक संबंधित जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच धरणगाव तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी दुःख व्यक्त केले.

