राज्याला पुन्हा पावसाबाबत यलो अलर्ट
मुंबई : आयएमडीने राज्यात आगामी दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट देतर उर्वरीत कोकणात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. दरम्यान,. मराठवड्यातील सर्वच जिल्ह्यांसोबत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आल्यानंतर गणेश विसर्जनानंतर आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी तर विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरीत राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.





