फैजपूरला कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे जयंतीनिमित्त 3 रोजी केळी परीसंवाद
Banana Dialogue फैजपूर : शेती आणि शेतकर्यांच्या विकासासाठी आयुष्य समर्पित केलेल्या माजी आमदार-खासदार कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या 70 व्या जयंती निमित्ताने केळी उत्पादक आणि केळी निर्यातीसाठी इच्छुक उद्योन्मुख उद्योजकांसाठी केळी परीसंवाद मंगळवार, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते दुपारी 12 दरम्यान मंगल लॉन, एच.पी.पेट्रोल पंपाजवळ, यावल रोड, फैजपूर येथे कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे मित्रपरिवारातर्फे आयोजित करण्यात आला आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या परीसंवादाचे उद्घाटक जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद असतील. मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ किरण ढोके हे केळी उत्पादक ते केळी निर्यातदार : यशस्वी प्रवास या विषयावर तर डॉ.के.बी.पाटील हे केळीचे अन्नद्रव्य आणि करपा, पिटींग व सीएमवी रोगाचे व्यवस्थापन या विषयावर तसेच युवा केळी निर्यातदार बलरामसिंग सोळंके हे आयात निर्यात प्रक्रिया, बँक हमी आणि जागतीक व्यापार या विषयावर मार्गदर्शन करतील. उपस्थितीचे आवाहन कृषीमित्र स्व.हरिभाऊ जावळे मित्र परीवाराने केले आहे.


