फैजपूरातील केळी परीसंवाद युवा उत्पादक शेतकर्यांना ठरेल ‘नवसंजीवनी’
Banana conference in Faizpur will be a ‘rejuvenation’ for young farmers फैजपूर : माजी आमदार व खासदार कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांच्या 70 व्या जयंतीचे औचित्य साधून केळी उत्पादक आणि केळी निर्यातीसाठी इच्छुक उद्योन्मुख उद्योजकांसाठी केळी परीसंवाद मंगळवार, 3 ऑक्टोंबर रोजी शहरात होत आहे. गेल्या अनेक दिवसानंतर भव्य स्वरूपात केळी परीसंवादाचे आयोजन करण्यात आल्याने युवा उत्पादक शेतकर्यांसाठी हा केळी परीसंवाद नवसंजीवनी ठरण्याची आशा आहे.
उद्योजकांची पहिली पसंती ग्रीन बेल्टला
यावलसह रावेर परीसराची ग्रीन बेल्ट म्हणून ओळख आहे. या भागातील केळी उत्पादक नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करीत केळी उत्पादन घेत असल्याने केळीची मोठ्या प्रमाणावर निर्यात वाढली आहे त्यामुळे निर्यातदार कंपन्या व व्यापार्यांनी या भागात डेरा मांडला आहे. आखाती देशांबरोबर देशांतर्गत बाजारपेठेतही या भागातील केळीला नेहमीच मोठी मागणी राहिली आहे. पंजाब, जम्मू व काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान येथेही रावेर भागातून केळी जाते या शिवाय अन्य भागातही या परीसरातीला केळीला मोठी मागणी आहे.

करपासह पिटींग रोगाची मिळेल माहिती
ग्रीन बेल्टमधील उत्पादकांना केळीवर करपा, चरका यासह विविध रोगांचा सामना करावा लागतो तर पिटींग नामक रोगदेखील आला असलातरी त्या रोगाची माहिती अनेकांना नाही त्यामुळे शेती आणि शेतकर्यांच्या विकासासाठी आयुष्य समर्पित केलेल्या स्व.हरीभाऊ जावळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी फैजपूर शहरातील मंगल लॉन, एच.पी.पेट्रोल पंपाजवळ, यावल रोड, फैजपूर येथे सकाळी आठ ते दुपारी 12 दरम्यान केळी परीसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परीसंवाद यशस्वी निर्यातदार शेतकरी तसेच केळी तज्ज्ञ सखोल मार्गदर्शन करणर आहे. यापूर्वी या पट्ट्यात केळी विषयक शिबिर झाले असलेतरी फैजपूरातील शिबिर हे भव्य असल्याने दूरवरून येथे केळी उत्पादक तसेच नव उत्पादक येण्याची आशा आहे. दरम्यान, केळी निर्यात वाढली तर केळी उत्पाकदांना मोठाच फायदा होणार आहे.
तज्ज्ञ मार्गदर्शक करणार मार्गदर्शन
मंगळवार, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते दुपारी 12 दरम्यान येथे कृषीमित्र स्व.हरिभाऊ जावळे मित्र परीवारातर्फे आयोजित या शिबिराचे उद्घाटक जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद असतील. मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ किरण ढोके हे ‘केळी उत्पादक ते केळी निर्यातदार : यशस्वी प्रवास’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील. केळी तज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील हे ‘केळीचे अन्नद्रव्य आणि करपा, पिटींग व सीएमवी रोगाचे व्यवस्थापन’ या विषयावर तसेच युवा केळी निर्यातदार बलरामसिंग सोळंके हे ‘आयात निर्यात प्रक्रिया, बँक हमी आणि जागतीक व्यापार’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सोलापूरचे शेतकरी हे साधारण शेतकरी निर्यातदार कसा होवू शकतो याबाबत आपले स्वानुभव कथन करणार आहेत. या परीसंवादात स्वतः मार्केट शोधा व निर्यातदार कसे होता येईल याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

