पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद : भुसावळ विभागात ‘स्वच्छतांजली’

शहरांसह ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम : नागरीकांसह लोकप्रतिनिधींचा मोहिमेत सहभाग


Cleanliness campaign in urban as well as rural areas : Involvement of public representatives including citizens in the campaign भुसावळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रविवार, 1 ऑक्टोंबर रोजी भुसावळसह विभागात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 105 व्या आवृत्तीच्या भाषणात देशवासीयांना स्वच्छतेचे आवाहन केले होते. या आवाहनाला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळाला. शहरीप्रमाणे ग्रामीण भागातही स्वच्छता राबवण्यात आली तर नागरीकांसह लोकप्रतिनिधींही मोहिमेत सहभाग नोंदवला. नागरीकांनी आपल्या घराचा परिसर, गल्ली, मार्ग, बगीचे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. ठिकठिकाणच्या नगरपालिकांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

भुसावळ स्टेशनवर स्वच्छता मोहिम
भुसावळ : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रेल्वे मंत्रालय 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा करत आहे. रविवार, 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता भुसावळ स्टेशनवर खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, अपर मंडळ रेल प्रबंधक कौशैलेंद्र कुमार, अपर मंडळ रेल प्रबंधक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, वरीष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता मोहित मंडलेकर, मंडळ परीचालन प्रबंधक योगेश पाटील, इतर रेल्वे अधिकारी , स्काऊट अ‍ॅण्ड गाईड सदस्य, रोटरी क्लब ऑफ भुसावळचे सदस्य सहभागी झाले व श्रमदान करून स्वच्छता मोहिम राबवण्यात आल.ी स्टेशन कर्मचारीदेखील सहभागी झाले.

बोदवड येथे आरोग्य तपासणी
बोदवड : स्वच्छ पंधरवडा व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत बोदवड नगर पंचायतमार्फत अधिकारी व कर्मचारी वर्गासाठी आरोग्य तपासणी बोदवड ग्रामीण रुग्णालयात बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. बोदवड नगरपंचायत अंतर्गत् 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून इंडीयन स्वच्छता लीग 2.0 व स्वच्छता पंधरवडा अंतर्गत शनिवार नगरपंचायतीतर्फे ग्रामीण रुग्णालयात, अधिकारी व कर्मचारी वर्गाची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे नियोजन बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी केले. आरोग्य शिबिरात नगराध्यक्ष आनंदा पाटील व सर्व नगरसेवक उपस्थित होते. आरोग्य शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ.नयन कलंत्री, डॉ.चिराग चौधरी व वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. बोदवड ग्रामीण रुग्णालयात आयुष्मान भव: या योजनेचाही कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

नाजी नाना महाविद्यालयात स्वच्छता मोहिम
फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा अंतर्गत रविवारी सकाळी एक तास श्रमदान करण्यात आले. उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद वाघुळदे यांनी केले. प्र.प्राचार्य डॉ.ए.आय. भंगाळे यांनी सदिच्छा भेट दिली. एक तास श्रमदानानंतर डॉ.जगदीश पाटील यांनी ‘गांधी समजून घेताना या विषयावर’ मार्गदर्शन करून तरुणांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक व स्वागत रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी करून सार्वजनिक स्वच्छतेची शपथ उपस्थित स्वयंसेवकांना दिली. प्रा.शेरसिंग पाडवी यांनी आभार मानले. वर्षा परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहा. महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.पल्लवी भंगाळे, ईश्वर चौधरी, रासेयो प्रतिनिधी गौरव सपकाळे, रोहिणी माळी यांनी परीश्रम घेतले.

सावदा येथे भाजपा व न.पा.तर्फे स्वच्छता अभियान
सावदा : पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी ’मन कि बात’ द्वारे 1 ऑक्टोंबर रोजी एक तास स्वच्छता अभियान करून श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सावदा भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा तसेच नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरवासीयांनी एकत्रीतपणे ‘स्वच्छांजली’ अर्पण केली. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहराध्यक्ष जे.के.भारंबे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, महेश अकोले, संतोष परदेशी, चेतन नेमाडे, सुयोग भिरुड, भैय्या भाऊ, राकेश पाटील, कुळकर्णी, अतुल चौधरी यांच्यासह नागरीक उपस्थित होते. शहरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

महात्मा गांधीजींना भालोद येथे ‘स्वच्छांजली’ अर्पण
फैजपूर  : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आवाहन केल्याप्रमाणे सेवा सप्ताह अंतर्गत एक तारीख, एक घंटा, एक साथ श्रमदान करून महात्मा गांधीजींना भालोद, ता.यावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परीरात सार्वजनिक स्वच्छता व श्रमदान अभियान राबवून स्वच्छांजली अर्पण करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले. याप्रसंगी भालोद सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

भोळे महाविद्यालयात स्वच्छ श्रमदान मोहिम
भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात रविवारी स्वच्छता सेवा अंतर्गत महाविद्यालयात श्रमदान करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातर्फे करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, डॉ.अंजली पाटील, डॉ.जी.पी वाघुळदे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ. संजय चौधरी कळवितात.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !