खेळताना पाय घसरून पाच वर्षीय चिमुकला खदानीत बुडाला : एरंडोल तालुक्यातील घटना


Five-year-old child falls into quarry after slipping while playing : incident in Erandol taluka एरंडोल : चिमुकल्यांसोबत खेळत असताना पाय घसरल्याने पाच वर्षीय खदानीत बुडून मयत झाल्याची घटना सोमवार, 2 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली. रोहित विकास पठाण (5, सावदे, ता.एरंडोल) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.

पाय घसरला अन् जीवाला मुकला
विकास सुपडू पठाण हे आपल्या पत्नी मोनी व पाच वर्षीय मुलगा रोहितसोबत वास्तव्याला आहे. सोमवार, 2 ऑक्टोबर रोजी सकाळी पठाण दाम्पत्य हे शेताच्या कामाला निघून गेल्यानंतर रोहित हा घरी एकटाच होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील काही लहान मुलांसोबत रोहितदेखील गावानजीक असलेल्या खदानीजवळ खेळण्यासाठी गेला असता खेळत असतांना त्याचा पाय घसरल्याने तो खदानीच्या पाण्यात पडला.

ही घटना घडल्यानंतर सोबत असलेल्या मुलांनी गावात धाव घेत घडला प्रकार सांगितला. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून पोहणार्‍यांच्या मदतीने त्याला बाहेर काढत जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. रोहित हा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात काळीज चिरणारा आक्रोश केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !