भुसावळात सेवा पंधरवडा अंतर्गत भाजयुमोतर्फे रक्तदान शिबिर
Blood Donation Camp by BHAYUM under Seva Fortnight in Bhusawal भुसावळ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत रक्तदान शिबिराचे खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या विशेष उपस्थितीत आयोजन करण्यात आले. हे शिबिर शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आयोजित करण्यात आले. शिबिरात 34 दात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे रक्तदात्यांमध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.
यांची शिबिराला उपस्थिती
शिबिरास खासदार रक्षा खडसे व भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे, भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, गिरीष महाजन, पुरुषोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, प्रमोद नेमाडे, अजय नागराणी, सतीश सपकाळे, देवा वाणी, प्रशांत पाटील, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, शैलजा पाटील, अलका शेळके, भाजप महिला शहराध्यक्ष अनिता आंबेकर, पल्लवी वारके, भाजयुमो शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, गौरव आवटे, वेदप्रकाश ओझा, पवन सरोदे, रवी ढगे, गोकुळ बाविस्कर, गोपीसिंह राजपूत, भावेश चौधरी, श्रेयस इंगळे, रेहमान शेख, केशव गेलानी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परीरसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरास केशवस्मुर्ती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम मोलाचे
रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी शंभूराजे ग्रुपसह गौरव राजेंद्र आवटे, किशोर टोके, शिव कैथवास, दीपक जाधव, राज रायकवार, सुनील पाटील, गणेश फेगडे, उज्वल पटेल, कल्पेश महाजन, अंकुश वावरे, बंटी धुमाळ, जय तोकडे, हर्षल शिंदे, अमर पवार, लाजरस मनी, शैलेंद्र क्यास्ते, राहुल शिवरामे, अतुल बढे, जितेंद्र डहाके, शुभम चौधरी आदींनी परीश्रम घेतले.

