भुसावळात स्वच्छता रनमध्ये धावले रेल्वे अधिकारी


भुसावळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून भुसावळ रेल्वे विभागातर्फे स्वच्छता रनचे सोमवारी आयोजन करण्यात आले. रेल्वे क्रीडांगणापसून स्पर्धेला सुरूवात झाली व पुन्हा त्याच ठिकाणी स्पर्धेचा समारोप झाला.

स्पर्धेला मंडल रेल प्रबंधक इती पांडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. या स्वच्छता रनमध्ये अपर मंडल रेल प्रबंधक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अपर मंडळ रेल प्रबंधक (तकनीकी) कौशैलेन्द्र कुमार, सर्व शाखांचे अधिकारी, रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंडचे अधिकारी आणि सदस्य आरपीएफ स्टाफ, तिकीट चेकिंग स्टाफ, स्काऊट गाईड, रेल्वे स्कूलचे विद्यार्थी, भुसावळ रनर्स ग्रुपचे सदस्य सहभागी झाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !