भुसावळातील जीम ट्रेनरची निर्घृण हत्या : तिघा आरोपींना पोलिस कोठडी


Brutal murder of gym trainer in Bhusawal : Three accused in police custody भुसावळ  : शहरातील जीम ट्रेनरची उधारीचे पैसे मागितल्याच्या वादातून दोघांनी चाकू व तलवारीचे वार करीत हत्या केली होती. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरातील केशव नगराजवळ घडली होती. या घटनेत नाजीश शेख नासीर (31, आझाद नगर, सिद्धेश्वर मंदिराजवळ, खडका रोड, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर संशयिताना अतिरीक्त सत्र न्यायालयाने सोमवारी 5 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

उधारीचा वाद तरुणाच्या जीवावर
भुसावळ शहरातील खडका रोड परीसरातील आझाद नगरात नाजीश शेख नासीर (31, आझाद नगर, सिद्धेश्वर मंदिराजवळ, खडका रोड, भुसावळ) या तरुणाने नात्याने मामी असलेल्या सुलतानाबी मुबारक खान (स्वामी विवेकानंद शाळेजवळ, केशव नगर, भुसावळ) यांना मुलीच्या लग्नासाठी त्याने साडेतीन लाख रुपये दिले होते व हे पैसे परत मागितल्यानंतर सुलतानाबी यांचा नाजीशसोबत शनिवारी रात्री 11 वाजता जोरदार वाद झाला व या वादात महिलेच्या भावासह भाच्याने उडी घेत धमकी दिली होती. त्यानंतर रविवारी सकाळी सहा वाजता नाजीश शेख नासीर (31) हा स्वामी विवेकानंद स्कूलजवळील माहीर फिटनेस नामक जीम उघडण्यासाठी जात असताना संशयित सुलतानाबी हिच्या घराजवळ दबा धरून असलेल्या संशयित आरोपी व महिलेचा भाऊ ईझहार उर्फ अज्जू जलालोद्दीन शेख (आझाद नगर, भुसावळ) व भाचा आसीफ दाऊद शेख (आझाद नगर, भुसावळ) यांनी तलवारीसह चाकूचे सपासप वार करीत तरुणाची हत्या केली होती.

याप्रकरणी शर्मिला शेख नासीर (48, आझाद नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून महिलेसह तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री संशयिताना अटक केल्यानंतर त्यांना सोमवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता 5 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश गोंटला करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !