नांदेड हादरले : 24 तासात नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू


Nanded quake : 24 dead including newborns in 24 hours नांदेड : नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच दिवसात अर्थात 24 तासात 12 नवजात (6 मुले, 6 मुली) अर्भके, सात महिलांसह पाच पुरूषांचा नांदेडमधील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू ओढवला आहे. 30 सप्टेंबरला 12 ते 1 ऑक्टोबर रात्री 12 वाजेदरम्यान ही घटना घडली. हा मृत्यू औषधांच्या तुटवड्यामुळे झाल्याची चर्चा असून याबाबत चौकशीचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत.

ठाणे घटनेची पुनरावृत्ती
ठाण्यातील कळवा येथील मनपाच्या रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी 24 तासांत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर नांदेडमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात विविध आजारांमुळे गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणार्‍या औषधांचा तुटवडा असल्याचीदेखील माहिती आहे तर. वैद्यकीय अधीक्षकांनीही ते मान्य केले आहे. रक्ताच्या चाचण्या व बहुतांशी औषधी बाहेरून आणाव्या लागत असल्ययाने रुग्णालय प्रशासनावर टिकेची झोड उठली आहे.



औषध तुटवडा हे मृत्यूचे कारण नाही
रुग्णालयास 508 खाटांची मंजुरी आहे. परभणी हिंगोली, यवतमाळ व तेलंगणातून रुग्ण येतात तर गेल्या दोन महिन्यांपासून या रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी केली जाते. औषध तुटवडा मृत्यूचे कारण नाहीच. 15 ते 16 रुग्ण रोजच मृत्युमूखी पडतात मात्र दोन दिवसांपासून बाह्यरुग्ण वाढल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शामराव वाकोडे म्हणाले.

नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घडल्या प्रकाराची चौकशी करण्याचे तसेच प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !