चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ; पावणेदोन लाखांचा गांजा जप्त


Chopra rural police major action; Marijuana worth fifty two lakhs seized चोपडा : चोपडा ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे दुचाकीवरून गांजा तस्करी करणार्‍या तिघांच्या मुसक्या बांधत त्यांच्याकडून सुमारे पावणेदोन लाखांचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई चोपडा तालुक्यातील लासुर ते सत्रासेन रोडवर नाटेश्वर मंदिराजवळ करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
लासूर गावापासून जवळच असलेल्या नाटेश्वर मंदिराजवळून जाणार्‍या लासूर ते सत्रासेन रोडवर 2 रोजी 12.30 वाजेच्या सुमारास तीन संशयातांकडे एक लाख 77 हजार 744 रुपये किंमतीचा गांजा (दोन मोटरसायकसह) आढळल्यानंतर तिघांना ताब्यात धेण्यात आले. टेट्या झगड्या बारेला (20, डुकल्यापाणी, ता.वरला, जि.बडवाणी, मध्यप्रदेश), बिलरसिंग दगड्या पावरा (22, खार्‍यापाडा, ता.चोपडा), मिथून दगड्या पावरा (19, खार्‍यापाडा, ता.चोपडा), अशी अटकेतील आरोपींची नोव आहेत. कॉन्स्टेबल भरत नाईक यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.



पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहाय्यक निरीक्षकशेषराव नितनवरे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !