नाशिकचा ड्रग्ज तस्कर फरार : कर्तव्यात कसूर करणार्‍या नऊ अधिकारी-कर्मचार्‍यांचे निलंबन


Nashik’s drug smuggler on the run : Suspension of nine officers-employees for dereliction of duty पुणे : ड्रग्ज तस्कर पसार झाल्याप्रकरणी पोलिस अधिकार्‍यासह नऊ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशिकचा ड्रग्जतस्कर ललित पाटील हा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पुण्यातील ससून रुग्णालयातून सोमवारी पसार झाल्यानंतर पुणे पोलिस आयुक्तांनी 9 पोलिसांना तडकाफडकी निलंबित केल्याची माहिती मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. पोलिस आयुक्त रीतेशकुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

यांच्यावर उगारला निलंबनाचा बडगा
कर्तव्यात बेफिकिरी केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, पोलिस हवालदार आदेश शिवणकर, पोलिस नाईक नाथाराम काळे, पिरप्पा दत्तू बनसोडे, अमित सुरेश जाधव यांना निलंबित करण्यात आले. नऊ कर्मचारी कोर्ट कंपनीसाठी नियुक्त होते.



पोलिसांसह रुग्णालय कर्मचार्‍यांची साथ
ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये ड्यूटीवर असताना बेकायदेशीरपणे ड्रग पार्सल आल्या प्रकरणात हलगर्जीपणा बाळगणार्‍या रमेश जनार्दन काळे, विशाल टोपले, स्वप्निल शिंदे, दिगंबर चंदनशिवे या चौघांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, तस्कर पाटील याला पोलिस खात्यातील व रुग्णालयातील काही कर्मचार्‍यांची साथ असल्याचा संशय आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !