जळगावातील 35 वर्षीय तरुणाने नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल
A 35-year-old youth from Jalgaon took an extreme step out of depression जळगाव : नैराश्यातून जळगावातील तरुणाने आत्महत्या केली. सुनील मधुकर चौधरी (35) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवार, 5 रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील सम्राट कॉलनीत घडली.
नैराश्यातून उचलले पाऊल
गेल्या अनेक वर्षापासून सम्राट कॉलनीत चौधरी हे पत्नी वैशाली, मुलगा कृष्णा (7),लहान मुलगा सोनू (4) यांचयासह वास्तव्याला होते. ते शहरातील बोहरा गल्लीत एका हार्डवेअरच्या दुकानावर कार्यरत होते. गुरुवारी सकाळी 8.30 वाजता सुनील यांनी त्यांच्या मोबाईलवरुन शहरात वास्तव्यास असलेले त्यांचे मावसभाऊ भूषण चौधरी यांच्याशी संपर्क साधून गप्पा केल्या. त्यानंतर पत्नी, मुले यांच्याशीही त्यांनी नेहमीसारखा संवाद साधला. वरच्या रुमवरुन येतो, असे कुटुंबियांना सांगून ते वर गेल्यानंतर त्यांनी गळफास लावला.


