एक लाख 10 हजारांची रोकड असलेली बॅग लांबवली : पारोळ्यात खळबळ
A bag containing 1 lakh 10 thousand cash was extended: Excitement in Parola पारोळा : पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी दुचाकीला लावलेली बॅग अलगद लांबवली. या बॅगेत एक लाख 10 हजारांची रोकड होती. ही घटना नाक्याजवळ बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. सीसीटीव्हीत अल्पवयीन चोरटा बॅग लांबवताना दिसून आला आहे. चोरीप्रकरणी पारोळा पोलिसात नोंद करण्यात आली. शहरातील सेंट्रल बँकेबाहेर दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली.
अल्पवयीन चोरट्यांनी अलगद लांबवली बॅग
सुनील हिंमतराव पाटील (रा.टिटवी, ता.पारोळा) हे आपल्या गावी टिटवी येथे दुधाचा व्यवसाय करतात. ग्राहकांना दुधाचे पेमेंट करण्यासाठी त्यांनी पारोळा येथील सेंट्रल बँकेतून सुमारे एक लाख दहा हजार रुपये काढले. ते पैसे एका पिशवीत ठेवले व दुचाकीच्या हँडलला टांगून ते कजगाव रस्त्यावर पोहोचले. तेथे आपल्या नातेवाईकाला बसमध्ये बसविण्यासाठी थांबले असता एका अज्ञात दहा ते बारा वर्षीय मुलाने दुचाकीला टांगलेली पैशांची पिशवी काढून पोबारा केला.


काही क्षणातच त्यांना पैशांची पिशवी गायब असल्याचे लक्षात आले असता लगेच आरडाओरड केली परंतु चोरटा लगेच पसार झाला. याबाबत घटनास्थळी लगेच पोलिसांनी धाव घेतली असता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दहा ते बारा वर्षीय अल्पवयीन चोरटा पिशवी चोरून पसार होत असल्याचे दिसून आले.
