भाजपाची पूर्व जिल्हा कार्यकारीणी जाहीर : भुसावळातील सतीश सपकाळे यांची उपाध्यक्षपदी वर्णी


जळगाव : भारतीय जनता पक्षाची जळगाव पूर्व अर्थात रावेर लोकसभा मतदारसंघासाठीची कार्यकारीणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी जाहीर केली. जळगाव जिल्ह्यासाठी भारतीय जनता पक्षाने तीन जिल्हाध्यक्ष दिले असून यात पूर्व भागाची जबाबदारी ही अमोल हरीभाऊ जावळे व पश्चिमची जबाबदारी ज्ञानेश्वर पाटील महाराज जळकेकर यांच्याकडे आहे. जळगाव महानगराध्यक्षपदाची धुरा उज्वला बेंडाळे यांना सोपविण्यात आली आहे.

कार्यकारीणी सर्वसमावेशक
जळगाव जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश प्रभारी रवी अनासपुरे व आमदार संजय सावकारे यांच्या सूचनेनुसार नवीन कार्यकारिीणी जाहीर केली आहे. यात जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष आदींसह विशेष निमंत्रीत सदस्यांचा समावेश आहे.

भुसावळातील समाजसेवक सतीश सपकाळे यांची वर्णी
नव्या कार्यकारीणीत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र चौधरी व पद्माकर महाजन (रावेर), तुकाराम निकम (जामनेर), शरद महाजन व हिरालाल चौधरी (यावल), दलपत चव्हाण व नजमा तडवी (मुक्ताईनगर), सतीश सपकाळे आणि सुनील काळे (भुसावळ), मधुकर राणे (बोदवड), अंबादास शिसोदिया व ज्योत्स्ना जितेंद्र पाटील (चोपडा) तसेच मधुकर राणे (बोदवड) यांची नियुक्ती करण्यात आली.

यांची सरचिटणीस व जिल्हा चिटणीसपदी वर्णी
राकेश पाटील (चोपडा), हरलाल कोळी (रावेर), आतीश झाल्टे (जामनेर),
परीक्षीत बर्‍हाटे (भुसावळ), वैशाली कुलकर्णी बोदवड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा चिटणीस म्हणून राजन लासूरकर (रावेर), राजधर पांढरे (जामनेर), भालचंद्र पाटील (भुसावळ), उज्वला माळके (चोपडा), विजय बडगुजर (बोदवड), श्रीकांत महाजन (रावेर), खुशाल जोशी (भुसावळ), प्रफुल्ल लुंकड (जामनेर) , सविता भालेराव (यावल), गोमती बारेला (रावेर), गुणवंत पिवटे (मुक्ताईनगर), ललित महाजन (मुक्ताईनगर), परमेश्वर टिकारे (बोदवड), रणछोड पाटील (चोपडा), रेखा बोंडे (भुसावळ) यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून नंदकिशोर महाजन (रावेर) यांची नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणीचे पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी स्वागत केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !