भुसावळात न्यायालयाच्या आदेशाने सव्वादोन कोटींचा गुटखा जाळला

गुन्हे शाखा निरीक्षकांसह अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यांची उपस्थिती ः कंटेनर मालकाला केले परत


Gutkha worth two and a half crores was burnt on the orders of the court in Bhusawal भुसावळ : राजस्थानातून जळगावकडे जाणारा तीन कंटेनर गुटख्याचा साठा तत्कालीन डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी भुसावळ-साकेगाव रस्त्यावर शुक्रवार, 1 एप्रिल 2022 रोजी करण्यात आली होती. यावेळी पथकाने तीन कंटेनरमधून दोन कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा तसेच एक कोटी 23 लाख रुपये किंमतीचे तीन कंटेनर असा एकूण साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. पोलिसांच्या तपासात या गुटख्याचे राजस्थान कनेक्शन समोर आले होते तर याप्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, जप्त गुटखा पोलिसांच्या ताब्यात असल्याने भुसावळ सत्र न्यायालयाने त्यास नष्ट (जाळण्याचे) आदेश दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी डंपिंग ग्राऊंडवर अधिकार्‍यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या उपस्थितीत गुटखा नष्ट
भुसावळचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सोमपाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात 1 एप्रिल 2022 रोजी नाशिक परीक्षेत्रातील सर्वात मोठी करण्यात आली होती तर तब्बल तीन कंटेनरमधून दोन कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. राजस्थानहून हा गुटखा जळगावकडे येत असल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते तर विशेष म्हणजे कंटेनर चालकांना केवळ मोबाईलद्वारे वाहन कुठे न्यायचे याच्या सूचना दिल्या होत्या.



दरम्यान, भुसावळ न्यायालयाने गुटखा नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, जळगाव एलसीबी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक बबन जगताप, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शरद पवार, सरकारी पंच आदींच्या उपस्थितीत गुटखा जाळून नष्ट केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !