जळगावात फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून दिड लाखांचा दंड वसुल
रेल्वेची मोहिम : जनरल तिकीटावरुन रीझर्व्ह डब्यात प्रवास करणार्यांवरही कारवाई
भुसावळ : विना तिकीट प्रवासासह जनरल तिकीटावरून स्लीपर डब्यात प्रवास करणार्यांविरुद्ध रेल्वेच्या विशेष मोहिम मंगळवारी जळगाव रेल्वे स्थानकावर 306 केसेसच्या माध्यमातून एक लाख एक लाख 51 हजार 45 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
धडक मोहिमेमुळे प्रवाशांमध्ये खळबळ
भुसावळ मंडळाचे वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा व सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार (टी.जा.) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव रेल्वे स्थानकावर मंगळवारी मोहिम राबवण्यात आली. त्यात रेल्वे सुरक्षा बलाचे ाच तर 25 रेल्वे तिकीट तपासणीसांनी केलेल्या कारवाईत 306 केसेसच्या माध्यमातून एक लाख 51 हजार 45 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. विना तिकीट प्रवास करणार्या 81 प्रवाशांकडून 41 हजार 455 रुपयांचा दंड तसेच जनरल तिकीटावरून स्लीपर डब्यात प्रवास करणार्या 223 प्रवाशांकडून एक लाख नऊ हजार 450 रुपयांचा तसेच सामानाची बुकींगविना वाहतूक करणार्या दोघा प्रवाशांकडून 436 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. एका प्रवाशाने दंड न भरल्याने त्याच्याविरुद्ध रेल्वे अॅक्ट 144 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर पाच प्रवाशांवर रेल्वे अॅक्ट 155 अन्वये कारवाई करण्यात आली. तपासणी पथकाचे मुख्य तिकीट निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्यासह विविध पथकातील तिकीट तपासणी कर्मचारी सहभागी झाले.



