भुसावळात ब्लॉकदरम्यान सात गाड्या खोळंबल्या


रेल्वे प्रवासी संतप्त : खडी टाकणारी गाडी नादुरुस्तचाही फटका

भुसावळ : भुसावळ-जळगावदरम्यान मंगळवारी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत ब्लॉक असतानाच खडी टाकणारी गाडी नादुरुस्त झाल्याने तब्बल सात गाड्या सुमारे तीन तासांपेक्षा अधिक विलंबाने धावल्याने रेल्वे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. रेल्वे प्रशासनाने रेल्वे लाईनीत खडी टाकण्यासाठी आणि रेल्वे रूळांची देखभाल करण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यत रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेतला असतानाच हा प्रकार घडला.

प्रवासी अधिक संतप्त
अप मार्गावरील भुसावळ ते जळगाव दरम्यान रेल्वे रूळांवर खडी टाकण्यासाठी मंगळवारी 11 ते 1 वाजेपर्यंत रेल्वेने ब्लॉक घेतला. त्यातच ब्लॉकच्याच काळात खडी टाकणारी रेल्वे गाडी नादुरूस्त झाल्याने अप मार्गावरील तब्बल सात गाड्या तीन तासांपेक्षा अधिक लेट झाल्या. अनेक गाड्या रेल्वे स्थानकावर थांबून असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला. समजलेल्या माहितीनुसार, रेल्वे लाईनीच्या आजूबाजूने खडी टाकणारी रेल्वे गाडी गेल्यनंतर अर्ध्या मार्गातच ही गाडी बंद पडल्याने वाहतूक सुरू करण्यास अडचणी आल्या. भुसावळ रेल्वे स्थानकासह अन्य स्थानकांवर काही गाड्या थांबवण्यात आल्या. रेल्वे प्रवाशांनी रेल्वे स्थानक प्रमुख आणि स्टेशन संचालक यांच्याकडे सातत्याने मार्ग सुरळीत होण्याबाबत विचारणा केली. ताप्तीगंगा एक्स्प्रेस तीन तास 30 मिनिटे, पुष्पक एक्स्प्रेस तीन तास 15 मिनिटे, कर्नाटक एक्स्प्रेस तीन तास 15 मिनिटे, गीांजली एक्स्प्रेस 3 तास, तुलसी एक्स्प्रेस 2 तास 30 मिनिटे, कामायनी एक्स्प्रेस एक तास 50 मिनिटे या सात गाड्या लेट धावल्याचे सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !