शिशिर जावळे यांना सरदार पटेल राष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर


Shishir Javale भुसावळ : साईनिर्मल फाउंडेशन, श्री नरेंद्र मोदी विचार मंचच्या व इतर अनेक विविध सामाजिक राजकीय संस्थांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले भुसावळ शहरातील समाजसेवक शिशिर दिनकर जावळे यांना राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक क्रांतिकारी सेवा व समर्पित भावनेने विविध क्षेत्रात सेवावृत्ती कार्य केल्याबद्दल सरदार पटेल राष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

31 रोजी पुरस्काराचे वितरण
पद्मश्री डॉक्टर मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, एन.वाय.के.क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नीती आयोग दिल्ली, आय.एस.ओ. नामांकित संस्थेच्या वतीने व डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र, उरळी कांचन यांच्या सहकार्याने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न अवॉर्ड 2023 हा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी हा पुरस्कार तिच्या माध्यमातून राष्ट्रसेवा घडावी या उद्देशाने हा पुरस्कार 31 ऑक्टोबर 2023 रोजी पुण्यामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत शिशिर जावळे यांना प्रदान केेला जाईल.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !