सातारा हादरले : पती-पत्नीची निर्घृण हत्या


Satara shakes: brutal murder of husband and wife सातारा : पती-पत्नीची धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी गावात घडली. पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. संजय रामचंद्र पवार व पत्नी मनीषा संजय पवार अशी खून झालेल्यांची नावे आहेत.

डोक्यात, मानेवर, धारदार शस्त्राने वार
पती- पत्नी दोघेही पवार दरा येथे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी शनिवारी रात्री दहानंतर विद्युत पंप सुरू करण्यास गेल्यानंतर अज्ञातांनी त्यांची हत्या केली. धारदार शस्त्राने डोक्यावर, मानेवर, गळ्यावर वार करून या दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली तर दुसर्‍या दिवशी सकाळी दोघांचेही मृतदेह शेतात आढळले



या निर्घृण हत्येमागचे कारण मात्र अद्याप समोर आले नसून पोलिस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !