चाळीसगावात अफूची 18 लाखांची बोंडे पकडली : पोलिसांना पाहताच चालक वाहन सोडून पसार


Opium worth 18 lakh seized in Chalisgaon: On seeing the police, the driver left the vehicle and ran away चाळीसगाव : चाळीसगाव पोलिसांनी गस्तीदरम्यान एका कारचा संशय आल्यानंतर पाठलाग करीत 18 लाखांची अफूची बोंडे जप्त केली तर पोलिसांना पाहताच संशयित चालक पसार झाला. पोलिसांनी रेल्वे स्टेशन माल धक्क्याजवळ ही कारवाई केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

संशय आल्यानंतर कारचा केला पाठलाग
चाळीसगाव शहरचे पोलिस उपनिरीक्षक सुहास आवाड हे रविवारी पहाटे गस्त करीत असतांना त्यांना शहरातील धुळे रोड महाविद्यालयाजवळ कार (क्रमांक एम.पी. 09 डब्यू.सी.1485) दिसल्यानंतर त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी चालकास थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने सुसाट वेगाने कार पळवल्यानंतर पथकाने पाठलाग सुरू केल्यानंतर चाळीसगाव रेल्वे स्टेशन माल धक्क्याजवळ वाहन सोडून चालक पसार झाला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात अफूची बोंडे आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या मोजणीत एक क्विंटल 80 किलो 240 गॅ्रम वजनाचे अफू बोंड जप्त करण्यात आले. याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.



यांनी केली कारवाई
ही कारवाई चाळीसगाव शहरचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनखाली सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले, योगेश माळी, हवालदार नितीन वाल्हे, राहुल सोनवणे, विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, महेंद्र पाटील, भूषण पाटील, तुकाराम चव्हाण, दीपक पाटील, विनोद खैरनार, निलेश पाटील, शरद पाटील, प्रविण जाधव यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !