भुसावळात 19 लाखांचे बायोडिझेल पकडले : चौघांविरोधात गुन्हा


Biodiesel worth 19 lakhs seized in Bhusawal : Crime against four भुसावळ : अवैधरीत्या बायोडिझेलची वाहतूक होत असल्याच्या संशयातून जळगाव गुन्हे शाखेने फेकरी टोल नाक्याजवळ रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गुजरातमधील 19 लाख रुपये किंमतीचे बायोडिझेलसदृश ज्वलनशील पदार्थ व दहा लाख रुपये किंमतीचा टँकर जप्त केला होता. टँकरमध्ये बायोडिझेलसदृश ज्वलनशील पदार्थाचा साठा आढळल्याने याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या वाहनात बायोडिझेल आहे वा नाही याबाबत अस्पष्टता असून पुरवठा विभागाच्या अहवालाअंती त्याबाबात काही सांगता येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांना टँकरद्वारे बायोडिझेलची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. जळगाव गुन्हे शाखेचे रणजीत जाधव, प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, अनिल महाजन आदींच्या पथकाने रविवारी दुपारी 12.30 वाजता फेकरी टोल नाक्याजवळ टँकर (जी.जे.12 बी.एक्स.0479) आल्यानंतर त्यास ताब्यात घेतल्यानंतर चालकाकडे कागदपत्रांची विचारणा केली असला चालक समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने वाहन तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.



याप्रकरणी गुन्हे शाखेचे कर्मचारी रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक महेंद्र कुमार रामविलास यादव (23, पुरेदौलत, डोह, ता.सलोन, जि.रायबरेली), वाहन मालक भावेशकुमार समतभाई उंडारीया (पासुदा, अंजार, गांधीधाम, कच्छ), आस्था इम्पेक्स (गांधीधाम, कच्छ, गुजरात) चे मालक (पूर्ण नाव, गाव माहित नाही), फेनी इंटरप्रायजेस, रानी तालाब रनंदगाव, छत्तीसगढचे मालक (नाव, गाव माहित नाही) यांच्याविरोधात गुरनं.207/2023, भादंवि 285, 287, 336, 34 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !