पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला
नवी दिल्ली : मध्यप्रदेशसह राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांनी पत्रपरीषदेत त्याबाबत माहिती दिली.
3 डिसेंबर रोजी जाहीर होणार निकाल
मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान होईल तर मध्यप्रदेशातही 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगनात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होईल तर 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला या सर्वांचे निकाल घोषीत होणार आहे.

पाच राज्यात विधानसभेच्या 679 जागा असून 16 कोटी 14 लाख मतदार आहे. त्यात 8.2 कोटी पुरुष, 7.8 कोटी महिला आणि 60.2 लाख नवोदित मतदार आहेत, असे राजीव कुमार म्हणाले. पाच राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांनी 31 ऑक्टोबरपर्यंत त्यांना मिळणार्या निधीची यादी द्यावी, अशा सूचनाही दिल्या. निधीची माहिती मिळाल्यावरच टॅक्समध्ये सूट देण्यात येईल. तसेच निवडणूक काळातील खर्चाचा तपशील देणं सर्वच उमेदवारांवर बंधनकारक असणार असल्याचेही ते म्हणाले.

