अज्ञात वाहनाच्या धडकेत बांभोरीच्या ट्रक चालकाचा मृत्यू


जळगाव : लघुशंका करत असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ट्रकचालक संतोष भावलाल नन्नवरे (30, रा. बांभोरी प्र.चा.) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री नशीराबादजवळ घडली.ट्रक चालक संतोष नन्नवरे हे सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजेच्या सुमारास नशीराबादकडून बांभोरीकडे ट्रकने मजुरांसह परतत असताना नशिराबादजवळ लघुशंका करण्यासाठी त्यांनी ट्रक उभा केल्यानंतर महामार्गावर लघुशंका करत असतांना महामार्गाहून जाणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांच्या डोक्यांचा गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मजूरांच्या लक्षात आल्याने त्यांनी नशिराबाद पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !