खंडवा स्थानकावर जम्मुतवी, हरीद्वार एक्स्प्रेसला थांबा


Stop at Khandwa station for Jammutavi, Haridwar Express भुसावळ : प्रवाशांची होत असलेली गर्दी आणि प्रवाशांची होत असलेली सुपरफास्ट गाड्यांना थांब्याची मागणी लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाकडून खंडवा आणि बर्‍हाणपूरला प्रत्येकी चार गाड्यांना थांबा देण्यात आल्याने प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली आहे.

प्रायोगिक तत्वावर थांबा
भुसावळ विभागातील बर्‍हाणपूर, खंडवा रेल्वे स्थानकावर गाड्यांना प्रायोगिक थांबा देण्यात आला आहे. हा थांबा येत्या सहा महिन्यांपर्यंत असेल. खंडवा रेल्वे स्थानकांवर थांबणार्‍या गाड्यांमध्ये (12751) हजुर साहिब नांदेड-जम्मूतवी सुपरफास्ट 13 ऑक्टोबरपासून रात्री 8.18 वाजता थांबणार आहे तसेच (12752) जम्मूतवी-हजुर साहिब नांदेड सुपरफास्ट ही गाडी 15 ऑक्टोबरपासून सकाळी 6.43 वाजता थांबेल. 12171 लोकमान्य टिळक टर्मिनस-हरीद्वार एक्सप्रेस ही गाडी 9 ऑक्टोबरपासून दुपारी 4.18 वाजता थांबेल तसेच 12172 हरीद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी 10 ऑक्टोंबरपासून दुपारी 12.18 वाजता थांबेल.

बर्‍हाणपूरला या गाड्यांना थांबा
खंडव्याप्रमाणेच बर्‍हाणपूर रेल्वे स्थानकावर सुध्दा चार गाड्यांना रेल्वेे मंत्रालयाकडून थांब्याची परवानगी देण्यात आली आहे. यात 19483 अहमदाबाद -बरोनी एक्सप्रेस ही गाडी 10 ऑक्टोबरपासून थांबेल, ही गाडी दुपारी 12.30 वाजता थांबेल. 19484 बरोनी-अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी सुध्दा 10 ऑक्टोंबरपासून दुपारी 1.29 वाजता पोहोचणार आहे. 22967 अहमदाबाद-प्रयागराज सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी 12 ऑक्टोंबरपासून पहाटे 2.39 वाजता पोचले. 22968 प्रयागराज-अहमदाबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस ही गाडी 13 आक्टोंबरला सकाळी 7.19 वाजता थांबेल. प्रवाशांनी थांबणार्‍या गाड्यांची नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !