जळगावात तलाठ्याला धक्का देत ट्रॅक्टर लांबवले
In Jalgaon, the tractor was dragged by pushing Talatha जळगाव : अवैध वाळू वाहत करत असलेल्या ट्रॅक्टरला महसूल पथकाने रोखत वाहन जप्त करीत ते जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या प्रशासकीय इमारत आवारात लावले होते मात्र वाळू माफियांनी सहाय्यक तलाठ्यास धक्काबुक्की करत बॅरीकेट्स तोडून ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले. ही घटना मंगळवार, 10 रोजी दुपारी दोन वाजता घडली. याप्रकरणी तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळू माफियांची दादागिरी वाढली
अवैध वाळू वाहतुक होवू नये,यासाठी जिल्हाधिकार्यांनी महसुलची पथके स्थापन करुन ते कार्यान्वित केले आहेत. गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळूची वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करण्यासाठी मंगळवारी दुपारी उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर यांनी पथकाला अजिंठा चौक याठिकाणी बोलविले. त्यानुसार म्हसावदचे सहाय्यक तलाठी आकाश काळे यांच्यासह नांद्रा, कंडारी येथील तलाठी, पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. वाळू वाहतूकीचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्राली दिसताच पथकाने ते थांबविले. पथकाने हे वाहन प्रशासकीय इमारतीच्या आवारात पार्किंग केले. अवैध वाळू संदर्भात महसूल पथक कागदपत्र बाबत पुर्तता करत असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास चालक अजय समाधान कोळी (निमखेडी) याने सहाय्यक तलाठी काळे यांना धक्का देत लावलेले बॅरीकेट्स तोडत वाहन सुसाट वेगाने पळवून नेले.


