रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : भोपाळ विभागातील रेल्वेचा ब्लॉक रद्द : गाड्या नियमित धावणार
Big relief for railway passengers: Railway block in Bhopal section cancelled : Trains will run regularly भुसावळ : भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकादरम्यान तिसरी लाईन सुरू करण्यासाठी व नॉन इंटरलॉकिंगच कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून 15 ते 27 ऑक्टोबर या काळात ब्लॉक घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. या ब्लॉकमुळे 11 गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या तर आठ गाड्यांच्या मार्गात बदल झाला होता मात्र मंगळवारी रात्री अचानक ब्लॉक रद्द करण्यात आल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केल्याने या मार्गावरील नियमित धावणार्या गाड्या तश्याच धावणार असून कुठलीही गाडी रद्द करण्यात आलेली नाही तसेच मार्गातही बदल करण्यात आलेला नाही.
ब्लॉक रद्दमुळे प्रवाशांना दिलासा
दसरा, नवरात्रोत्सवामुळे रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढली असतांनाच रेल्वे प्रशासनाकडून भोपाळ विभागात नॉन इंटरलॉकीं ग काम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला होता. यामुळे प्रवासी गाड्यांना याचा फटका बसत होता मात्र रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेला ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. या ब्लॉकचा फटका हा 11 रेल्वे गाड्यांना बसणार होता तर आठ गाड्यांचे मार्ग बदल करण्यात आले होते. ब्लॉक रद्द झाल्याने भोपाळकडे जाणार्या सर्व गाड्या त्यांच्या नियाोजीत वेळेतच धावणार आहे.



