चेहर्‍यावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग


Minor girl molested by threatening to throw acid on her face जामनेर : अल्पवयीन मुलीच्या चेहर्‍यावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी देत विनयभंग करण्यात आला. ही घटना जामनेर तालक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
जामनेर तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. गेल्या 28 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2023 दरम्यान संशयित हुसेन शहा नसीर सहा हा तिचा पाठलाग करीत होता. मुलीला रस्त्यावर थांबवून माझ्याशी निकाह कर, तु मला बाजारात भेटत जा, तु जर नाही भेटली तर तोंडावर अ‍ॅसीड मारेल, तु जर माझी झाली नाही तर तुला दुसर्‍याचीही होवू देणार नाही, अशी धमकी देत मुलीचा विनयभंग करण्यात आला. हा प्रकार घडल्यानंतर पीडीत मुलीने नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर पहूर पोलिसात धाव घेण्यात आली. संशयित आरोपी हुसेन शहा नाशिर शहा याच्या विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !