धक्कादायक ! : जळगावातील अल्पवयीन तरुणीची आत्महत्या


Shocking ! : Suicide of a minor girl in Jalgaon जळगाव : शहरातील ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी (17, रा. विठ्ठल पेठ) या अल्पवयीन तरुणीने अज्ञात कारणातून गळफास घेतला. हा प्रकार शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

भावाला बाहेर पाठवून तरुणीने केली आत्महत्या
विठ्ठलपेठ परीसरात ट्विंकल चौधरी ही आई-वडील व लहान भाऊ यांच्यासोबत रहिवास करीत होती शिवाय अकरावीत शिक्षण घेत होती मात्र शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी तिची आई नातेवाईकांकडे शिरपूर येथे गेल्यानंतर वडील शेतात गेले होते. लहान भाऊ दीपकला दुपारी अडीच वाजता तिने लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठविले व तिने राहत्या घरात गळफास घेतला. थोड्यावेळाने लहान भाऊ घरी आला त्या वेळी त्याला बहिणीने गळफास घेतल्याचे दिसताच त्याने टाहो फोडला.



दरम्यान, आत्महत्येचे ठोस कारण समोर आले नसलेतरी अल्पवयीन पूजा ही काही दिवसांपासून कोणत्यातरी तणावात होती, असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. तिच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !