रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : दसरा, दिवाळी, छठपूजेनिमित्त 30 विशेष गाड्या धावणार
Big relief for railway passengers : 30 special trains will run on the occasion of Dussehra, Diwali, Chhath Puja भुसावळ : दसरा, दिवाळी, छटपूजेच्या पार्श्वभमीवर रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेत 30 उत्सव गाड्या चालविणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. या गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहे. यामुळे विभागातील प्रवाशांची सोय या गाड्यांच्या माध्यमातून होणार आहे. सणवारांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेतून 30 फेर्या चालविल्या जाणार आहे. यामुळे सणावारात प्रवाशांना जागा उपलब्ध होणार आहे.
या गाड्या धावणार
मुंबई-नागपूर सुपरफास्ट स्पेशल (20 फेरी) होतील. गाडी (02139) सुपरफास्ट स्पेशल गाडी गुरुवार, 19 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत दर सोमवार आणि गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 12.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी (02140) सुपरफास्ट स्पेशल गाडी 21 ऑक्टोंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत दर मंगळवार आणि शनिवारी दुपारी 1.30 वाजता नागपूरहून निघेल आणि दुसर्या दिवशी पहाटे 4.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा धामणगाव आणि वर्धा येथे थांबणार आहे. या गाडीला 16 एसी- थ्री टियर इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन असतील तसेच नागपूर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या 10 फेर्या होणार आहे. गाडी 02144 सुपरफास्ट स्पेशल गाडी 19 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी संध्याकाळी 7.40 वाजता नागपूरहून निघेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 11.25 वाजता पुण्याला पोहोचेल. 02143 सुपरफास्ट स्पेशल गाडी ही 20 ऑक्टोंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी पुण्याहून दुपारी 4.10 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन आणि उरळी येथे थांबणार आहे. या गाडीला 16 एसी-3 टियर इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन असतील. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
