नशिराबादनजीक बलेनाच्या धडकेने महिलेचा मृत्यू : कार चालकाविरोधात गुन्हा


Woman dies after being hit by Balena near Nasirabad: Crime against car driver जळगाव : प्रवासी रीक्षावर भरधाव कार आदळून झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील महिलेचा मृत्यू झाला होता. हा अपघात बुधवारी. 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडला होता. याप्रकरणी शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नशिराबाद पोलिसात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मासमाबी शेख जुबेर अहेमद (30, बोराखेडा, ता.मोताळा) असे मयताचे नाव आहे.

प्रवासी रीक्षावर कार आदळली
जळगावकडून भुसावळकडे येत असलेली प्रवासी रीक्षा (एम.एच.19 बी.यू.5843) वर मागून आलेली भरधाव कार (एम.एच.19 ई.ए.5109) आदळून झालेल्या अपघातात रीक्षा उलटल्याने मासमाबी शेख जुबेर अहेमद (30, बोराखेडा, ता.मोताळा) ही महिला ठार झाली तर रीक्षातील शेख जुबेर अहेमद शेख मेहबुब (40), रीक्षा चालक करीम बेग शरीफ बेग (29), शेख सादीक शेख इसार (40) व शेख उमेमा फातीमा शेख जुबेर अहमद (वय 6) हे चौघेजण गंभीर जखमी झाले होते.



जखमींना नजीकच्या डॉ.उल्हास पाटील मेडीकल कॉलेजात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. अपघातप्रकरणी शेख सादीक शेख इसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक दत्तू सुधाकर कोळी (39, जळगाव) याच्या विरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अतुल महाजन करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !