अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवले : पारोळा तालुक्यातील महिला ठार


Unknown vehicle blows up two-wheeler : Woman of Parola taluk killed धरणगाव : अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने तामसवाडी येथील महिला ठार झाली. हा अपघात धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील पोखरी तांडा फाट्याजवळ घडला. अपघातप्रकरणी महिना भरानंतर शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता धरणगाव पोलिसात अज्ञात दुचाकीवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. झामाबाई काशीनाथ महाजन (तामसवाडी, ता.पारोळा) असे मयताचे नाव आहे.

अपघातात दुचाकीस्वार गंभीर
दिलीप भिकन माळी (43, तामसवाडी, ता.पारोळा) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून शेती काम करून आपला उदरनिर्वाह करतात. 15 सप्टेंबर रोजी दिलीप माळी हे आपली आत्या झामाबाई काशीनाथ महाजन (तामसवाडी, ता.पारोळा) यांच्यासोबत दुचाकीने जळगाव शहरात येत असतांना सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील पोखरी तांडा फाट्याजवळ त्यांच्या मागून येणारी दुचाकीने जोरदार धडक दिली.



या धडकेत झामाबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दिलीप माळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. दरम्यान, उपचार घेतलल्यानंतर महिन्याभरानंतर शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता दिलीप माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार उमेश भालेराव करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !