कोल्हापूरातील पोलिस कर्मचार्‍यासह तिघे भीषण अपघातात ठार


मलकापूर : पुणे-बंगळूरु महामार्गावर पाचवडफाट्या नजीक शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात पोलिस कर्मचार्‍यासह तिघे ठार झाले. भरधाव कार मालट्रकवर धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये राजवाडा पोलिस ठाणे कोल्हापूर येथे कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यासह बहिण व भाच्याचा समावेश आहे. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली.

तिघांचा जागीच मृत्यू
पोलिस कर्मचारी नितीन बापूसाहेब पोवार (34, रा.कोल्हापूर), मनीषा आप्पासाहेब जाधव (42) व अभिषेक आप्पासाहेब जाधव (26 दोघेही रा.मु.पो.जरळी, ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.



पोलिस कर्मचारी पोवार हे कार (क्रमांक एम.एच.01 ए.एल.5458) द्वारे बहिण वा भाच्याला घेऊन कोल्हापूरकडून पुण्याकडे जात असताना पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे भाग्यलक्ष्मी हॉटेलजवळ उभ्या असलेल्या आयशर ट्रकला भरधाव वेगातील कार धडकली. या अपघातात कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !