जळगावात शतपावली करणार्‍या महिलेची धूमस्टाईल पोत लांबवली


 The Dhoomstyle texture of a woman performing Shatpavali in Jalgaon was extended
जळगाव :
 शतपावली करणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत धूम स्टाईल लांबवण्यात आली. ही घटना जळगाव शहरातील खोटे नगर ते गुजराल पेट्रोल पंपकडे जाणार्‍या रोडवरील मॉ प्लायवूड समोर शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा वाजता जळगाव तालुका पोेलिसात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशी आहे नेमकी घटना
सीमा युवराज पाटील (40, खोटे नगर, जळगाव) ही महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 13 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पायी जात असताना त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीवर आले व त्यांनी काही कळण्याआत गळ्यातील 30 हजार रूपये किंमतीची पोत लांबवली.



महिलेले आरडाओरड केली परंतु तोपर्यंत दुचाकीवरील चोरटे पसार झाले होते. यानंतर महिलेने तातडीने जळगाव तालुका पोलिसात घेवून तक्रार दिली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !