वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी आवारात प्रौढाचा खून

कुरापत बेतली जीवावर : डोक्यावर काठी मारताच झाला मृत्यू


Murder of an adult in Varangaon Ordnance Factory premises वरणगाव : वरणगाव फॅक्टरी आवारातील सुशील नगर सर्कलनजीक मित्रांमध्ये किरकोळ वादातील कुरापतीचा वाद वाढल्याने डोक्यात काठी मारताच मित्राचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत प्रमोद ज्ञानेश्वर महाजन (58, शिवाजीनगर, वरणगाव) यांचा मृत्यू झाला. खून प्रकरणी संशयित आरोपी दीपक सिंग (50, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी) यास वरणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अशी घडली घटना
मुक्ताईनगरातील 81 गाव पाणीपुरवठा विभागात कर्मचारी असलेले प्रमोद महाजन हे एका मित्रासोबत वरणगाव फॅक्टरीतील सुशील नगर सर्कलवर आल्यानंतर त्यांची संशयित आरोपी तथा मित्र असलेल्या दीपक सिंग सोबत भेट झाली. यावेळी गप्पांमध्ये जुना वाद उकरून निघाल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली व काहींनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला मात्र पुन्हा कुरापत निघाल्यानंतर संशयित दीपक सिंगने काठीचा फटका प्रमोद महाजन यांच्या डोक्यावर मारताच घाव वर्मी लागताच त्यांचा मृत्यू झाला.



पोलिस अधिकार्‍यांची धाव
पोलिस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, वरणगावचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !