देवी मूर्ती आणताना अपघातात मेहरुणच्या तरुणाचा मृत्यू


Mehrun’s young man died in an accident while bringing the goddess idol जळगाव : जळगावातील मेहरुण भागातील तरुणाचा देवी मूर्ती आणताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजय उर्फ जितू गोपाल कोळी (35, रा.जोशी वाडा, मेहरूण) असे मयताचे नाव आहे.

मूर्ती अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू
जळगाव शहरातील मेहरूण भागातील जोशी वाडा परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मूर्ती आणण्यासाठी काही तरुण बर्‍हाणपूर येथे गेले होते. तेथून परतत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड फाट्याजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्या अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडून या तरुणाचा मृत्यू झाला.



तरुणाच्या मित्रांनी तत्काळ तरुणाला उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मयत घोषित केले. कुटुंबियांना फोनवर माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी जळगाव येथील एका कंपनीत संजय हा खिडक्यांच्या सेंटरिंगचे काम करीत होता. मयत जितू उर्फ संजय कोळी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !