भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धाडसी कारवाई : तीन पिस्टल, चार काडतुसांसह खडक्यातील त्रिकूट जाळ्यात

संशयित गिरीश तायडे पसार : घातपातापूर्वीच पोलिसांनी उधळला डाव : पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे


Brave action by Bhusawal market police : Three pistols, four cartridges in a trap in Khadka भुसावळ : पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार व वाळू चोरीच्या गुन्ह्यात वॉण्टेड गिरीश तायडे हा शस्त्रांसह वाहनातून येत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्यानंतर रविवारी पहाटे पोलिसांनी कोम्बिंग राबवले मात्र पोलिसांना पाहताच संशयित स्कॉर्पिओतून पसार होवू लागताच पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवले मात्र गिरीश तायडे पसार होण्यात यशस्वी झाला तर त्याचे तीन साथीदार मात्र जाळ्यात अडकले. संशयितांकडून तीन गावठी पिस्टल, चार जिवंत काडतूस, सहा फायबर रॉड, तीन मोबाईल काडतूस व स्कॉर्पिआ वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी रविवारी दुपारी पाच वाजता बाजारपेठ पोलिसात ठाण्यात आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
कुविख्यात गिरीश तायडे याने काही दिवसांपूर्वी महसूल पथकावर चोरीची वाळू पकडल्यानंतर हल्ला केला होता व त्या गुन्ह्यात (गुरनं.430/2023) संशयित गावात स्कॉर्पिओ (एम.एच.19 डी.व्ही.2333) द्वारे शहरातील खडका चौफुलीवर येत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर रविवारी पहाटे खडका चौफुलीवर नाकाबंदी करण्यात आली. पहाटेच्या सुमारास संशयित वाहन आल्यानंतर पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने सुसाट वाहन पळवल्याने पोलिसांनी पाठलाग सुरू केला व तायडे याच्या ढाब्यावर वाहन थांबताच संशयित पसार होत असताना तिघांना पकडण्यात यश आले मात्र गिरीश तायडे हा शेतातून पसार झाला.



तीन पिस्टलासह चार काडतूस जप्त
पोलिसांनी यावेळी धीरज प्रकाश सोनवणे (39, पाण्याच्या टाकीजवळ, खडका), मुकेश जयदेव लोढवाल (23, ज्ञानज्योती शाळेजवळ, बिंदीया नगर, खडका) व संजय शांताराम कोळी (39, पाण्याच्या टाकीजवळ, खडका) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता मुकेश व संजय यांच्याकडे दोन पिस्टल आढळले, दोन काडतूस तर वाहनात एक पिस्टल व दोन जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करण्यात आले.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार सुनील जोशी, हवालदार विजय नेरकर, हवालदार रमण सुरळकर, हवालदार यासीन पिंजारी, हवालदार महेश चौधरी, हवालदार निलेश चौधरी, हवालदार उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल योगेश माळी आदींनी पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !