रेल्वे प्रवाशांना दिलासा : दसरा, दिवाळी, छटपूजेनिमित्त रेल्वे प्रशासनाकडून अतिरीक्त गाड्यांच्या 96 फेर्या
भुसावळ : दसरा, दिवाळी, छटपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची रेल्वे गाड्यांअभावी गैरसोय होऊ नये यसाठी रेल्वेतर्फे 96 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना ऐन सणवारात रेल्वे गाड्यांमध्ये जागा मिळणार असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. या गाड्यांना भुसावळ जंक्शनवर थांबा देण्यात आल्याने प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.
उत्सवात प्रवाशांची गैरसोय टळणार
रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी आणि प्रवाशांची वाढत असलेली प्रतीक्षा यादी पाहता प्रवाशांची सण-वारात गैरसोय होऊ नये, जागेअभावी प्रवास रद्द करावा लागू नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळ्या विभागात लांबपल्याच्या 98 फेर्या होणार आहे. यामुळे प्रवाशांना जागा मिळणार आहे. दसरा, दिवाळी, छटपूजा यासाठी या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे नियमित गाड्यांवरील प्रवाशांचा ताण, गर्दी कमी होणार आहे.




या गाड्यांना भुसावळातही थांबा
लोकमान्य टिळक टर्मिनस-समस्तीपूर एसी साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल गाडी (14 फेर्या) असलेली विशेष गाडी ही 19 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात दर गुरूवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 12.15 वाजता सुटून दुसर्या दिवशी रात्री 9.15 वाजता समस्तीपूरला पोहोचणार आहे. 01044 ही विशेष गाडी 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या काळात दर शुक्रवारी रात्री 11.20 वाजता समस्तीपूरहून सुटेल व तिसर्या दिवशी सकाळी 7.40 वाजता एलटीटीला पोहोचणार आहे. यागाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी जंक्शन, मिर्झापूर, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 20 एलएचबी कोच असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस-बनारस साप्ताहिक विशेष गाडी (14 फेर्या)होणार आहे. 01053 स्पेशल गाडी दि. 16 ऑक्टोबर ते 27 नोव्हेबरपर्यंत (7 फेर्या) दर सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी 12.15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी 4.05 वाजता बनारसला पोहोचेल. 01054 ही स्पेशल गाडी 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर या काळात दर मंगळवारी बनारस येथून रात्री 8.30 वाजता सुटून दुसर्या दिवशी रात्री 11.55 वाजता एलटीटीला पोहोचेल. ही गाडी कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छेओकी जंक्शन वर थांबणार आहे.
पुणे जंक्शन-अजनी एसी सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडीच्या (14 फेर्या) होणार आहे. 02141 विशेष गाडी 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत दर मंगळवारी पुण्यातून दुपारी 3.15 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी पहाटे 4.50 वाजता अजनीला पोहोचणार आहे. 02142 ही स्पेशल गाडी 18 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर या काळात दर बुधवारी अजनी येथून संध्याकाळी 7.50 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 11.35 वाजता पुण्यात पोहोचणार आहे. ही गाडी दौंड दोरमार्ग, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबेल.
पुणे-गोरखपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी (01431) स्पेशल गाडी शुक्रवार, 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या काळात दर शुकव्रारी दुपारी 4.15 वाजता पुण्यातून सुटेल व दुसर्या दिवशी रात्री 9 वाजता गोरखपूरला पोहोचणार आहे.
01432 ही स्पेशल गाडी शनिवार, 21 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर या काळात धावणार आहे. गोरखपूरहुन ही गाडी रात्री 11.25 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी सकाळी 6.25 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दौंड मार्ग लाइन, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद येथे थांबणार आहे.
या गाड्यांचा चालविण्याचा वाढविला कालावधी
रेल्वेने ज्या काही विशेष गाड्यांचा कालावधी ऑक्टोबर, नोव्हेबरमध्ये संपत होते, त्यांच्यात वाढ केली आहे त्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. यात एलटीटी-बल्हारशाह स्पेशलचा विस्तार कालावधीत (4 फेर्या) धावणार आहे. 01127 एलटीटी-बल्हारशाह साप्ताहिक विशेष गाडी 21 ते 28 नोव्हेबरपर्यत वाढविली आहे. तर 02238 ही बल्लारशाह साप्ताहिक विशेष गाडी 22 व 29 नोव्हेंबर या दोन फेर्या वाढविल्या आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.