अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह दुचाकी जप्त : जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
Seizure of two-wheeler with tractor-trolley for illegal sand transport: Performance of Jalgaon MIDC Police जळगाव : अवैध वाळूची वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टर, ट्रॉली वाळूसह दोन दुचाकी असा मुद्देमाल मेहरुण ट्रॅक परीसरातील कृष्णा लॉन्सजवळ एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला.
वाळूसह वाहने जप्त
रविवार, 15 रोजी सकाळी 8.45 वाजता शहरातील मेहरूण तलाव परीसरात कृष्णा लॉन्सजवळ किशोर रामदास नाईक (जामनेर) यांच्या मालकीच्या विनाक्रमांक ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमधून विना परवाना वाळूची चोरटी वाहतूक करत होते. पोलिसांनी या ठिकाणी कारवाईतून वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टर-ट्रॉली, वाळू तसेच दुचाकी एम.एच.19 ई.सी.8528 तसेच दुचाकी एम.एच.19 डी.इेड. 8101 असा एकूण तीन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कॉन्स्टेबल राहुल रगडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संदीप शांताराम शेगोकार, अनिल ब्रिजलाल नाईक, विशाल भाउसिंग पवार, जितेंद्र कनीराम राठोड, वाहन मालक किशोर रामदास नाईक यांच्या विरुध्द गुन्हा एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


