खेडीआव्हाणेतील शेतकर्‍याची गळफास घेत आत्महत्या


A farmer in Khediavahan committed suicide by hanging himself जळगाव : कुठल्यातरी कारणातून जळगाव तालुक्यातील खेडी आव्हाणेतील 53 वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेतला. ही घटना सोमवार, 16 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विलास श्रावण सोनवणे (53, खेडी आव्हाणे, ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
विलास सोनवणे हे पत्नी, मुलगा यांच्यासोबत जळगाव तालुक्यातील खेडी आव्हाणेत वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोणत्यातरी नैराश्येत होते. सोमवार, 16 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !