भुसावळातील तरुणाकडून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त

अंमली पदार्थाच्या झडतीदरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई


Two live cartridges along with village knife seized from Bhusawal youth भुसावळ  : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अंमली पदार्थाचा साठा असल्याच्या संशयातून शहरातील एका तरुणाच्या घरात छापेमारी केली मात्र अंमली पदार्थाऐवजी तरुणाच्या घरात गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस आढळल्याने तरुणाला अटक करण्यात आली. राहुल रामदास क्षिरसागर (35, फडके खानावळजवळ, अष्टभूजा हॉटेलमागे, भुसावळ) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील जामनेर रोडवरील अष्टभूजा हॉटेलमागील संशयित राहुल क्षिरसागर या तरुणाकडे अंमली पदार्थाचा (ड्रग्ज) साठा असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने मंगळवारी पहाटे तरुणाच्या घराची झडती घेतली. घरात ड्रग्ज साठा आढळला नसलातरी तरुणाच्या घरातून 25 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल, दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. कॉन्स्टेबल प्रशांत रमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.



यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार सुनील जोशी, विजय नेरकर, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत रमेश परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !